राष्ट्रवादीच्या चित्रपट व सांस्कृतिक विभाग जिल्हाध्यक्षपदी 'यांची' निवड

 राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी प्रा.श्याम वसंत शिंदे यांची नियुक्तीनगर : राष्ट्रवादी भवन येथे अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष राजेंद्र फाळके पाटील यांचे हस्ते प्रा. श्याम शिंदे यांना उपरोक्त नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. बाबासाहेब पाटील ( अध्यक्ष - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - महाराष्ट्र प्रदेश , चित्रपट , साहित्य , कला व सांस्कृतिक विभाग ) यांनी सदर नियुक्ती केली आहे. या प्रसंगी कर्जत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष काका तपकीर तसेच अहमदनगर शहर राष्ट्रवादीचे संघटक राजेश भालेराव , युवा कार्यकर्ते संचित निकम , जेष्ठ कलादिग्दर्शक सुधीर देशपांडे , शिवाजी रणसिंग , नंदेश शिंदे , श्रेयस शिंदे , कुंदा शिंदे आदी उपस्थित होते. या नियुक्तीबद्दल  राष्ट्रवादी पक्षाचे आमदार संग्रामभैय्या जगताप आणि अहमदनगरच्या कला क्षेत्रातील अनेकांनी प्रा. शिंदे यांचे अभिनंदन केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post