लग्न समारंभात घुसुन चोरी करणारी टोळी गजाआड, २३ लाखांचा मुद्देमाल जप्त

 लग्न समारंभात घुसुन चोरी करणारी टोळी गजाआड, २३ लाखांचा मुद्देमाल जप्तनगर - शिर्डीसह विविध ठिकाणी लग्न समारंभात पाहुणे मंडळीकडील रोकड, दागिने लंपास करणारी मध्य प्रदेशातील टोळी पोलिसांनी शिताफीने जेरबंद केली आहे. शिर्डी पोलिस ठाण्यात दाखल एका गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेने थेट मध्य प्रदेशात जाऊन आरोपींना अटक केली. यात गोलू सुमेर मोजा उर्फ सिसोदीया, (वय-२५ वर्षे, मूळ रा. बडा पिपलीयों, जि- देवास, मध्यप्रदेश), संदीप सुमेर मोजा उर्फ सिसोदीया,( वय- १९ वर्षे)यांना पिपलीयों, मध्यप्रदेश येथून ताब्यात घेतले. त्यांना विश्वासात घेवून सदर गुन्ह्याबाबत व गुन्ह्यातील इतर साथीदाराबाबत विचारपूस केली असता त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना अधिक विश्वसात घेवून कसून चौकशी केली असता त्यांनी त्यांचे साधीदारांची माहिती सांगून त्यांचे नावे सांगीतले. त्यावरुन सदर साथीदार आरोपींचा शोध घेवून आरोपी  राधेशाम उदयराम राजपूर कुर, (वय-३० वर्षे), विपीन राजपाल सिंग, (वय-२९ ), गिरीराज दिनेशचंद शुक्ला, (वय- ५५ वर्षे) दिल्ली, ६) अनिल कमल सिसोदीया, (वय ३०) , विशालकूमार बनी सींग,( वय- १९ वर्षे), यांना देवास, मध्यप्रदेश येथून वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले. आरोपीकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या रोख रकमेपैकी ५५,०००/-रु. रोख रक्कम तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली वाहने१३,००,०००/-रु. किं. ची हुंडाई कंपणीची व्हेन्यू कार, ९,००,०००/-रु. किं. ची मारुती सुझूकी कंपणीची सफेद रंगाची बलेनो कार,वेगवेगळ्या कंपण्यांचे सहा मोबाईल फोन असा एकूण २३,३३,०००/-रु. किं. ची वाहने व रोख रक्कम जप्त करण्यात आलेले आहेत. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post