शिवसेनेकडून केंद्रीय मंत्री राहिलेल्या 'या' नेत्याच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा

 

शिवसेनेचे माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहितेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चानागपूरः राष्ट्रवादीत सध्या जोरदार इनकमिंगवर सुरू आहे. आता शिवसेनेचे माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांची त्यांनी भेट घेतली असून, मोहितेंच्या पक्ष प्रवेशावर जोरदार खलबतं सुरू आहेत. सुबोध मोहिते यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला होता, परंतु त्यानंतर माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी मतभेद निर्माण झाले आणि त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी संबंध तोडले. तत्पूर्वी नारायण राणे यांच्या सोबत मोहीते यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post