महावितरणला मनसे इशारा, 'वसुली भाईगिरी' थांबवा अन्यथा हल्लाबोल

 महावितरणने ‘वसुली भाईगिरीथांबवावी

सुमित वर्मा
     नगर - महावितरण सध्या ‘वसुली भाईगिरी’ करुन सक्तीची वीज बिले वसूल करत आहेती तात्काळ थांबवावीया मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्यावतीने वीज वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता यांना देण्यात आलेयाप्रसंगी जिल्हाध्यक्ष सुमित वर्माअनिकेत शियाळतालुकाध्यक्ष प्रकाश गायकवाडसनी वैराळप्रमोद ठाकूरआदेश गायकवाडबजरंग रणसिंगसंतोष गवतेशुभम काळे आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते.

     अधिक्षक अभियंता यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे कीलॉकडाऊनचे 3 ते 4 महिने सर्वकाही बंद असतांना ज्यांचे रोजच्या कामाईवर सर्वकाही अवलंबून असतेअशा लोकांना त्यांचे व्यवसायिकघरगुती लाईटबील अव्वाच्या सव्वा आलेले आहेतक्लासेसनर्सरीप्ले ग्रुप सारख्यांचे तर अजूनही सर्व वर्ग बंद आहेतपण आपल्या कर्मचार्यांकडून बळजबरीने वीज बील वसूली करण्यात येत आहेयातून मार्ग काढण्याबाबत कोणतेही पाऊल आपल्या कार्यालयाकडून उचलले गेल्याचे दिसत नाहीउर्जामंत्री खोटे आश्वासन देऊन जनतेची दिशाभूल करतातपण सर्वसामान्य जनतेचा विचार कोणीही करतांना दिसत नाही.

     ज्या लोकांना खोटी वीज बिले दिलीअंदाजे बीले दिलीत्यांना दुरुस्तीसाठी रक्कम भरायला लावणे ,त्यात  जे सावकरी व्याज लावत आहेतत्यावर मनसेचा आक्षेप आहे.

आपण तात्काळ ही ‘तोडा-तोडी’ थांबवावीजनतेला या त्रासातून मुक्त करावे अन्यथा येत्या आठ दिवसात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने आपल्या कार्यालयावर ‘हल्लाबोल’ आंदोलन करण्यात येईलत्यानंतर होणार्या गोष्टींना तुम्ही स्वतजबाबदार असाल  असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post