आ.निलेश लंके यांची राज्य सरकारच्या 'या' समितीवर निवड

आ.निलेश लंके यांची माथाडी हमाल व श्रमजीवी कामगार संघटनेच्या राज्य समितीवर निवडनगर -पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांची माथाडी हमाल व श्रमजीवी कामगार संघटनेच्या राज्य समितीवर निवड झाली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या भगतसिंग कोश्यारी आदेशानुसार व नावाने यासंबंधीचे महाराष्ट्र शासनाच्या वतीने‌ सोमवार दि.२२ ‌फेब्रुवारी रोजी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे उपसचिव डॉ.श्रीकांत पुलकुंडवार यांनी राजपत्र जाहीर करण्यात आली असून राज्यातील प्रमुख ८ आमदारांसह औद्योगिक व कामगार संघटनेच्या प्रतिनिधींचा समावेश यामध्ये करण्यात आलेले आहे.

(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मुंबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई  दिनांक २२ फेब्रुवारी २०२१ अधिसूचना काढली असुन‌ माथाडी हमाल व श्रमजीवी कामगारांचे‌ प्रश्न व समस्या सोडवण्याचे काम ही समिती करत असते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post