महाआवास अभियानास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

 महाआवास अभियानास 31 मार्चपर्यंत मुदतवाढ        मुंबई:     राज्यात 1 एप्रिल २०२० पासून आतापर्यंत विविध ग्रामीण गृहनिर्माण योजनांमधील ३ लाख ३७ हजार ९७८ लाभार्थ्यांच्या घरकुलांना मंजूरी देण्यात आली असून २ लाख ९८ हजार ०९७  लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचे प्रदान करण्यात आले आहे. आतापर्यंत १ लाख ८५ हजार ०३० घरकुले बांधून पूर्ण झाली असून उर्वरीत घरकुले 31 मार्चपर्यंत पूर्ण करुन मिशन झीरो राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी महाआवास अभियानास 31 मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची घोषणाही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी आज येथे केली.

            मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले कीघरकुलविषयक सर्व योजना ह्या ग्रामीण भागातील गरीबबेघर यांना दिलासा देणाऱ्या आणि घरकुलाचे त्यांचे स्वप्न साकार करणाऱ्या महत्वाच्या योजना आहेत. या योजनांसाठी काम करणे हे एक प्रकारचे सामाजिक कार्य आहे. त्यामुळे घरकुलविषयक सर्व योजनांची जिल्हा परिषदापंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींचे सर्व अधिकारीकर्मचारी यांनी प्रभावी अंमलबजावणी करुन ग्रामीण गरीबबेघरांना घरे उपलब्ध करुन देण्यात यावीतअसे आवाहन त्यांनी यावेळी केले.

    जागा उपलब्ध नसल्यामुळे राज्यात ७४ हजार ३७३ पात्र लाभार्थ्यांना घरकुले बांधता आली नाहीत. या लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. गायरान तसेच शेती महामंडळाच्या जागा घरकुल बांधकामांसाठी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आपण महसूल मंत्र्यांशी चर्चा करणार आहोतअसेही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post