आ.निलेश लंके यांची संवेदनशीलता ...आणि गरीब आजीबाईंच्या दोन नातींची समस्या चुटकीसरशी सुटली....
नगर : पारनेर चे आमदार निलेश लंके हे अतिशय संवेदनशील म्हणून परिचित आहे. त्यामुळे अडलेनडलेले अनेक जण त्यांच्या कडे समस्या घेऊन जातात. अशाच एक आजीबाई त्यांच्या कडे दोन नातींना घेऊन आल्या. दोन्ही मुलींना आई नसून वडील अपंग आहेत. मुलींना शिकण्याची खूप इच्छा आहे पण आर्थिक परिस्थिती चांगली नाही. ही व्यथा ऐकताच आ.लंके यांनी लगेचच या मुलींना शाळेत जाण्यासाठी सायकली व शालेय साहित्य दिलं. पुढील शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. आ.लंके यांच्या या तत्परतेने आजीबाई व त्यांच्या नातीचे चेहरे चांगलेच खुलले.
स्वतः आ.लंके यांनी सोशल मिडिया अकाउंटवर हा वेगळा अनुभव शेअर केलाय...
जनाबाई भास्कर चौधरी या आज माझ्या जनसंपर्क कार्यालयात आपल्या दोन छोट्या नातीनां घेऊन भेटण्यासाठी आल्या होत्या , त्या मुलींची विचारपूस केली असता, त्यांना आई नसून वडील अपंग असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचे पालन पोषण त्यांच्या म्हाताऱ्या आजी करत आहेत. त्यांची आर्थिक परिस्तिथी नाजूक असल्याचे समजले,तसेच त्या दोन्ही मुलींना रोज शाळेत जाण्यासाठी दीड ते दोन किलोमीटर पायी जावे लागत असल्याचे सांगितले. त्यानंतर माझ्या सहकाऱ्याला सांगून त्यांना लवकरात लवकर सायकल देण्याची व्यवस्था केली. व मुलींना शालेय साहित्य दिले.तसेच भविष्यात आजींना लवकरच घरकुल कसे मिळवून देता येईल हा शब्द दिला. व भविष्यात या दोन्ही मुलींना शालेय शिक्षण घेण्यासाठी जेवढी मदत करता येईल ती करेल....!!
Post a Comment