सत्काराचा खर्च सत्कारणी लावा, आ.लंके यांच्या आवाहनाला मिळतोय प्रतिसाद

सत्काराचा खर्च सत्कारणी लावा, आ.लंके यांच्या आवाहनाला मिळतोय प्रतिसाद नगर : कार्यक्रमावेळी हार तुरे असा सत्कार न करता गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीसाठी सहकार्य करा, या आमदार निलेश लंके यांच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आ.लंके हे मतदार संघात एका लग्नाला गेले असता वधूवरांकडील मंडळींनी सत्कारावरील खर्च टाळून ५ हजार रुपये लंके प्रतिष्ठानला दीले.

झावरे आणि बोरकर विवाह प्रसंगी उपस्थित राहून नवविवाहित वर आणि वधुस  आ.लंके यांनी भावी  आयुष्याचा शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी सत्काराचा अनावश्यक खर्च टाळून झावरे परिवारा तर्फे निलेश लंके प्रतिष्ठानला मुलांच्या शालेय वस्तू साठी 5000 रुपये देण्यात आले. आ.लंके यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post