महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडील 'या' जमिनी ग्रामपंचायतीकडे वर्ग कराव्यात

 कृषी विद्यापीठासंबधित मागण्यांबाबत कृषी मंत्री भुसे यांच्याशी चर्चानगर : राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठाशी संबंधित मागण्यांसाठी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी कृषी मंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन चर्चा केली.विद्यापीठाच्या पडीक, खडकाळ, नापीक जमिनीवर वर्षानुवर्षे राहत असलेल्या नागरिकांना शासकीय नागरी सुविधा उपलब्ध होत नाहीत, त्यामुळे सदर जमीन ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात यावी आणि येथील नागरिकांची बांधकामे नियमित करण्यात यावी ही मागणी केली.तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठातील सुरक्षा रक्षक म्हणून स्थानिक तरुणांना प्राधान्य द्यावे अशीही मागणी कृषीमंत्री दादाजी भुसे यांना केली. यावेळी राहुरी खुर्द, डिग्रस येथील शिष्टमंडळ उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post