माजी मंत्री कर्डिलेंचे मोठं वक्तव्य... बरं झालं जिल्हा बँकेत बिनविरोध संचालक झालो नाही....

 नगर तालुका खरेदी-विक्री संघाच्यावतीने माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचा सत्कार

बिनविरोध संचालक झालो नाही बरं झालं : माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले
नगर : जिल्हा बॅकेच्या निवडणुकीमध्ये बिनविरोध निवड झाली नाही, हेच बरे झाले. अन्यथा
बिनविरोध झालो असतो तर कारखानदार प्रस्थापित म्हणाले असते की, आमच्यामुळेच संचालक
झाले. मी संचालक झालो हे जिराईत भागातील शेतकऱ्यांच्या मतावर आणि शेतकऱ्यांनाही वाटत
होते की, जिल्हा बँकेत मी संचालकपदी असावा. मी सर्व सामान्यांचा पुढारी आहे. माझ्या विजयातून
आता प्रत्येकाला उत्तर दिले आहे. मी मंत्री, आमदार असताना माझा एवढ्या मोठ्या प्रमाणात
सत्कार झाले नाही परंतु या निवडणुकीत संचालकपदावर निवडून गेलो. त्यामुळे जिल्ह्यातून सर्व
स्तरातून अभिनंदन व सत्कार होत आहे. पहिल्या दिवसापासून मला राजकारणात संघर्ष करावा
लागला. त्यातून सत्ता मिळत आहे. संघर्ष केल्याशिवाय मलाही करमत नाही. राजकारणात मी
नेहमीच गोरगरीबांचे प्रश्‍न मांडतो व सोडवतो. चांगले निर्णयही घेतो. जिल्हा बॅकेत गेल्या १५ वर्षात
बँकेच्या कर्मचाऱ्यांना व सोसायट्यांच्या सचिवांचे महत्वाचे निर्णय घेऊन त्यांना न्याय देण्याचे काम
केले आहे. बॅंकेमध्ये कर्डिलेंनी नव्हे तर कारखानदारांनी खरा धुडगूस घातला आहे, असे प्रतिपादन
माजी मंत्री कर्डिले यांनी केले.

माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांची जिल्हा सहकारी बॅकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल नगर तालुका खरेदी-विक्री संघाच्यावतीने सत्कार करताना चेअरमन सुरेश सुंबे, व्हा.चेअरमन छत्रपती बोरुडे, संचालक प्रा. संभाजी पवार, अंबादास बेरड, अंबादास शेळके, ज्ञानदेव
शिंदे, जगन्नाथ कराळे, अनिल ठोंबरे, लक्ष्मण नरवडे, श्रीकांत जगदाळे, अप्पासाहेब कुलट आदी
उपस्थित होते.

सुरेश सुंबे म्हणाले की, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली नगर तालुका खरेदी-विक्री संघाचे कामकाज चालते. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम करत आहे. भविष्यकाळात संघाच्या माध्यमातून विविध चांगले निर्णय घेऊन शेतकऱ्यांना लाभ दिला जाईल. श्री. कर्डिले हे जिल्हा बँकेवर निवडून येणे ही शेतकऱ्यांसाठी
अतिमहत्त्वाचे होते. नगर तालुक्‍यातील मतदारांनी एकमताने त्यांना निवडून दिले., असे ते म्हणाले.
यावेळी प्रा. संभाजी पवार यांनी सर्वांचे आभार मानले.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post