भीषण अपघात....पपई वाहतूक करणारा ट्रक उलटला, १५ मजूर ठार

 

पपई वाहतूक करणारा ट्रक उलटला, १५ मजूर ठारजळगाव: जळगावच्या यावल तालुक्यात रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 15 मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

यावल तालुक्यातील किनगाव नजीक हा अपघात घडला. साधारण रात्री एक वाजताच्या सुमारास येथील यावल चोपडा रस्त्यावर असणाऱ्या एका वळणावर ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि ट्रक पलटी झाला. पपई घेऊन हा ट्रक बाजारपेठेकडे चालला होता. ट्रकमध्ये भरलेल्या पपयांच्या वरती मजूर बसले होते. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post