विखे पाटील यांचा भाजपमध्ये मान व पदांसाठी संघर्ष

विखे पाटील यांचा भाजपमध्ये मान व पदांसाठी संघर्ष, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा टोला नगर : भाजप नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य सरकार वर केलेल्या टिकेचा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तिखट शब्दात समाचार घेतला आहे. विखे यांची भाजपमध्ये घुसमट होत असून राळेगणसिद्धी येथील फोटो पाहून तुमची भाजपमध्ये घुसमट होत असल्याचे दिसून येते असा टोला देशमुख यांनी लगावला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विखेंना टोला लगावणारे व्टिट करताना राळेगणसिद्धी येथील एक फोटोही अपलोड केला आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लिहिले आहे की, 

जी सरकारचं एकदम व्यवस्थित चाललंय! तुम्ही काळजी करू नका. मला वाटतं भाजपमध्ये तुमची घुसमट होतेय.काल परवा अण्णा हजारेंच्या राळेगणसिद्धीत ते दिसलंय. तुम्हाला बसायला देखील खुर्ची नव्हती. मान आणि पदांसाठी आमचा नव्हे तुमचाच संघर्ष चाललांय. फक्त तुम्हाला दिसत नाही एवढंच!

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post