महसुली कर व करेतर रक्कम भरण्यासाठी खास मोबाईल ॲप

महसुली कर व करेतर रक्कम भरण्यासाठी ‘ग्रास महाकोष’ मोबाईल ॲपची निर्मितीमुंबई, दि. 6 : महसुली कर व करेतर रक्कम भरणा करण्याची सुविधा देणाऱ्या ग्रास महाकोष (gras mahakosh Maharashtra) या अँड्रॉइड मोबाईल ॲपची निर्मिती महाराष्ट्र राज्याच्या लेखा व कोषागरे संचालनालयाने केली असून या ॲप्लिकेशनचे उद्घाटन वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या हस्ते नुकतेच झाले.

 हे ॲप GRAS वेबसाईट व गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राने या ॲप्लिकेशनची निर्मिती केली असून एनआयसीचे तज्ञ अधिकारी बालकृष्ण नायर व त्यांचे सहयोगी विशाल नळदुर्गकर यांचा हे ॲप विकसित करण्यात मोलाचा वाटा आहे.

महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील कोणत्याही विभागाशी संबंधित करदाते, इतर संस्था, शासकीय कार्यालये तसेच सर्वसामान्य नागरिक देखील २४X७ या ‘ग्रास’ ॲपचा वापर करुन शासनाच्या खात्यात रक्कम जमा करू शकतात. देयकांचे आदान-प्रदान, कर व करेतर रकमा व इतर बहुतांशी कामकाज ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत असलेल्या लेखा व कोषागरे संचालनालयामध्ये ग्रास (GRAS) मोबाईल ॲपचे विकसन हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे.

 या व्यतिरिक्त अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई तसेच कोषागार व उपकोषागार कार्यालयाकडून देयकांना लावण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या आक्षेपांची माहिती करून घेऊन आक्षेप लागू नयेत याबाबतची परिपूर्ण व अद्ययावत माहिती देणारे देयक वेळीच कशी पारित होतील? याबाबत मार्गदर्शक ठरेल, असे पुस्तकही प्रकाशित करण्यात आले. ही पुस्तके PDF स्वरुपात संचालनालयाच्या “महाकोष” या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत.

यावेळी प्रधान सचिव (ले व को) श्री. नितीन गद्रे,  प्रधान सचिव (वित्तीय सुधारणा) श्री. राजगोपाल देवरा व सचिव (व्यय) श्री. राजीव मित्तल, लेखा व कोषागरे संचालक श्री.ज.र.मेनन, सहसंचालक श्री.जि.रा.इंगळे, उपसंचालक श्री.विनोद शिंगटे, सहायक संचालक श्रीमती प्रगती धनावडे व श्रीमती चित्रलेखा खातू उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post