शिवशाहीर विजय तनपुरे यांनी जगभरातील नगरींना दिला 'यशाचा महामंत्र शिवतंत्र '

 शिवशाहीर विजय तनपुरे यांनी जगभरातील नगरींना दिला 'यशाचा महामंत्र शिवतंत्र ' ग्लोबलनगरी फौंडेशन तर्फे आयोजित डॉ. विजय महाराज तनपुरे यांचा 'यशाचा महामंत्र शिवतंत्र 'हा कार्यक्रम काल अतिशय सुंदररीत्या पार पडला.

खरं तर ग्लोबलनगरी तर्फे खूप सुंदर, माहितीवर्धक आणि नावीन्यपूर्ण उपक्रमाद्वारे आयोजन नेहमीच केल जात.डॉ. विजय तनपुरे यांचा विशेष कार्यक्रम हे कालचे एक उत्तम उदाहरण  !!!


त्यांच्या भारदस्त आवाजाने आणि पोवाडागायन शैलीने सगळे जण मंत्रमुग्ध झाले होते.जणू सर्व वातावरण शिवमय होऊन गेले.


शिवरायांचा पोवाडा गातांना अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आणणारे शाहीर हे किती मोठे कलागुण घेऊन जन्माला आलेले असतात याची काल प्रचिती झाली.

आपण आज परदेशामध्ये सर्व जण खूप कामात व्यस्त असतो. असायलाही हवे,परंतु जेव्हा असे काही सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केले जाते त्यावेळी त्यासाठी वेळ काढणे आपले पहिले कर्तव्य बनते.

असे हे बहु्गुणी सुपुत्र जे आपल्याच भूमीत वाढलेत मात्र त्यांच्यातील हे शाहिरी कौशल्य जगाला आपण नाही सांगणार तर कोण सांगणार हा प्रश्न नक्की पडतो..

कालच्या कॉल वर कित्येक जणांनी त्यांना वेगवेगळ्या देशात येण्याचे आमंत्रण दिले त्या वेळी मन अगदी भरून आलं. आजही आपला माणूस ओळखणारी मंडळी जगाबाहेर आहे आणि तीही नगर जिल्ह्यातील हे बघून धन्य वाटले.

डॉ. विजय तनपुरे यांचा खडतर जीवन संघर्ष आणि अती प्रचंड ध्येय वृत्तीने त्यांनी वयाच्या दुसऱ्या वर्षी आलेलं पोलिओचे संकट कसे विषासमान पचवले आणि जेथे सर्व काही बेचिराख झाले असे वाटले तेव्हा फिनिक्स पक्ष्यासारखे राखेतूनही पुन्हा जन्म घ्यावा तसा त्यांनी स्वतःचा इतिहास घडवला. आज ते विश्वशाहीर म्हणून संपूर्ण भारतात आणि भारताबाहेर प्रसिद्ध आहेत.

माननीय बाळासाहेब ठाकरेंना सलग 49 वेळा भेटणं हे ऐकून मी भारावून गेलो. त्यांच्या वरील पोवाडा आणि इतर 135 पोवाडे यांचे लिखाण आणि गायन करणे हे साध्या व्यक्तीचे काम नाही ते बाळकडू जन्मजात असावं लागत..

तीन तास चाललेला हा कार्यक्रम खरोखर संपूच नाही असं वाटत होते.

वेळ केव्हा गेला खरोखर कळालेच नाही.कलाकाराची कला सादरीकरण हे अविरत चालु असते आपण त्यांच्या पर्यंत पोहचू शकत नाही हे आपले दुर्दैव असते कलाकारांचे नाही.

जरी आपण त्यांना ओळखत नसलो तरी त्यांचे काम अविरतपणे चाललेले असते एखाद्या धगधगत्या मशाली सारखे   !!!

डॉ. विजय महाराज तनपुरे  यांचा कार्यक्रम जर पुढच्या वेळी कोठे अनुभवता आला तर नक्की अनुभव घ्या.


डॉ. विजय महाराज तनपुरे  यांचे खूप आभार आणि धन्यवाद !!!!

 

शब्दांकनः 

- प्रकाश फासाटे (मोरक्को)

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post