उच्चशिक्षित मुलं हमाल पंचायतचा अभिमान - अविनाश घुले
नगर - प्रत्येक पालक हा आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करत असतो. आपल्याला ज्या अडी-अडचणी आल्या त्या मुलांना येऊ नये, त्यांनी उच्च शिक्षित व्हावे, मोठे व्हावे, नाव कमवावे, यासाठी धडपडत असतो. मुलंही आपल्या पालकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे मेहनत करतात. हमाल-माथाडी कामगारही आपल्या मुलांच्या वाट्याला कष्टाचे काम येऊ नये, त्यासाठी स्वत:कष्ट करुन त्यांना उच्च शिक्षित करत आहेत. आज समाधान शिवाजी गीते याने सी.ए. होऊन तर सतीश परमेश्वर गीते याने वकिल होऊन आपल्या हमाल वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे. आज ही उच्चशिक्षित मुलं हमाल पंचायतचा अभिमान असल्याचा प्रतिपादन जिल्हा हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले यांनी केले.
जिल्हा हमाल पंचायतीच्यावतीने सी.ए. परिक्षेत समाधान शिवाजी गिते तर वकिली परिक्षेत सतीश परमेश्वर गिते उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा सत्कार जिल्हाध्यक्ष अविनाश घुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपाध्यक्ष गोविंद सांगळे, सचिव मधुकर केकाण, बहिरु कोतकर, रविंद्र भोसले, सुनिल गिते, पांडूरंग चक्रनारायण, नाथा कोतकर, राहुल घोडेस्वर, वाल्मिक सांगळे, नवनाथ बडे, शिवाजी गिते, निलेश कानडे आदि उपस्थित होते.
यावेळी सचिव मधुकर केकाण यांनी हमाल पंचायतीच्या विविध उपक्रमांची माहिती देऊन यशस्वी पाल्यांचा परिचय करुन दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बहिरु कोतकर यांनी केले तर आभार रविंद्र भोसले यांनी मानले. यावेळी राजू गिते, श्रीधर गिते, जालिंदर नरवडे, तबाजी कार्ले, अर्जुन शिंदे, सुनिल गिते, नवनाथ लोंढे, राम पानसंबळ, राजू चोरमले, लता बरेलिया आदि उपस्थित होते.
Post a Comment