भेसळीच्या संशयावरून सुमारे ५ कोटींचा खाद्य तेलाच्या साठा जप्त, अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई

 

अन्न व औषध प्रशासनाच्या धाडीत चार कोटी ९८ लाख रुपयांचा खाद्यतेल साठा जप्तमुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने मुंबई व परिसरातील अनेक ठिकाणी  धाडी टाकल्या असून आठ खाद्यतेल रिपॅकर्स व घाऊक विक्रेते यांच्यावर कारवाई घेण्यात आली. सर्व ठिकाणी मिळूण एकूण ४,९८,७४,९७३/- (चार करोड अठयान्नव लाख चौऱ्याहत्तर हजार नऊशे त्र्याहत्तर फक्त) रुपायांचा खाद्य तेलाचा साठा जप्त  करण्यात आला असून एकूण ९३ खाद्य तेलाचे नमुने विश्लेषणार्थ घेण्यात आले आहेत. या धाडीत एकूण ३० अन्न सुरक्षा अधिकारी सामिल झाले होते.

राज्यातील जनतेच्या आरोग्याची प्रथम जबाबदारी लक्षात घेवून, त्यांच्या दैनंदिन आहारातील परिणामकारक अन्न पदार्थाचा दर्जा तपासण्याची जाणीव लक्षात ठेवून प्रशासनास प्राप्त होणाऱ्या गोपनीय माहितीच्या आधारे धाडी टाकल्या जातात.

प्रमाणित आढळलेल्या खाद्य तेलाचा जप्तसाठा तात्काळ विक्रीसाठी खुला करण्याचे व अप्रमाणित  नमुन्या बाबतीत कडक कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश अन्न सुरक्षा आयुक्त, म.राज्य यांनी दिले आहेत.

वरील धाडीच्या आधारे महाराष्ट्र राज्यातील सर्व विभागामध्ये खाद्य तेलाच्या दर्जाची सखोल तपासणी करण्याचे आदेश सर्व सह आयुक्तांना देण्यात आले असुन गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करण्याच्या सक्त सुचना देण्यात आलेल्या आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post