'माझ्या मुलांचा सांभाळ करावा उद्या सकाळी माती आहे सर्वांनी यावे', व्हाट्सअपवर स्टेटस ठेऊन शेतकऱ्याची आत्महत्या .

व्हाट्सअपवर स्टेटस ठेऊन शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रापरभणी : राज्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र काही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. परभणी जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने  कर्जवसुलीच्या तगाद्याला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे शेतकऱ्याने उद्या सकाळी मातीला या असे व्हॉटसअ‌ॅप स्टेटस ठेवून आत्महत्या केली आहे. चंद्रकांत धोंडगे असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. धोंडगे यांच्या  आत्महत्येने तिवठाणा गावामध्ये खळबळ उडाली आहे. 

परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील तिवठाणा या गावात चंद्रकांत उर्फ मुंजाजी धोंडगे हे शेती करायचे. त्यांना कर्जाची परतफेड करण्यासाठी वारंवार धमक्या येत होत्या. कर्ज वसुलीच्या तगाद्या कंटाळून चंद्रकांत भगवान धोंडगे यांनी आत्महत्या केली. धोंडगे यांनी आत्महत्या करत असल्याबाबतचे स्टेटस व्हॉटसअ‌ॅपवर ठेवले होते.


चंद्रकांत धोंडगे यांनी आत्महत्येपूर्वी व्हॉट्सअ‌ॅपवर “आपल्याला पैशासाठी धमक्या येत आहेत म्हणून मी आत्महत्या करत आहे. माझ्या मुलांचा सांभाळ करावा उद्या सकाळी माती आहे सर्वांनी यावे. पैश्यांमुळे मला त्रास झाला आहे.” असे स्टेटस ठेऊन चंद्रकांत धोंडगे यांनी विषारी औषध प्राशन केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post