अवैध दारू प्रकरणी सुमारे १० लाखांचा मुद्देमाल जप्त, नगर व बीड 'एक्साईज'ची संयुक्त कारवाई.... Video

 

अवैध दारू प्रकरणी सुमारे १० लाखांचा मुद्देमाल जप्त, नगर व बीड एक्साईजची संयुक्त कारवाईनगर : राज्य उत्पादन शुल्क खात्याचे .आयुक्त कांतीलाल उमाप, विभागीय उपआयुक्त प्रसाद सुर्वे  व अधीक्षक गणेश पाटील साहेब यांचे मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नगर व बीड येथील पथकाने संयुक्तपणे कारवाई करीत पाथर्डी तालुक्यातून सुमारे १० लाख रुपयांची फक्त गोवा राज्यात विक्रीसाठी परवानगी असलेली दारू जप्त केली आहे.

निरीक्षक ए.बी.बनकर यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या अधारे राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र.१ अहमदनगर व राज्य उत्पादन शुल्क बीड विभाग यांनी संयुक्तीक मोहीम राबवून दिनांक ३१ जानेवारी रोजी सचीन विठ्ठल शेळके याचे राहते घरी (वडगाव शिवार ता.पाथर्डी जि.अहमदनगर) या ठिकाणी  छापा मारून गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेला विदेशी मद्याचा साठा मॅकडाॅल नं.१ व्हिस्कीचे ५२ बॉक्स, इंपेरियल ब्लू व्हिस्कीच्या १० बॉक्स, म्याकडोल  रमचे ३ बॉक्स व बनावट देशी दारू भिंगरी संत्राचे ९ बॉक्स‌ जप्त केले.आरोपी सचीन विठ्ठल शेळके  यास ताब्यात घेवून  मद्य साठा व त्याची अवैधप्रकारे वाहतुक करण्यासाठी वापरण्यात आलेले चारचाकी वाहन (क्र.एम.एच.१६ एवाय ४९१०) मिळून असा एकूण रु.१०,१७,७८४/- किमतीचा मुद्देमाल जप्त करून त्याचा साथीदार फरार आरोपी बाळासाहेब रामराव जायभाये (रा.पिंपळनेर ता.शिरूर कासार जि.बीड) या दोघा विरुद्ध  गुन्हा नोंद केला आहे. सदरची कारवाई भरारी पथकाचे निरीक्षक अण्णासाहेब बनकर व घरतळे, दिंडकर दुय्यम निरीक्षक अजित बडदे, महीपाल धोका, विजय सूर्यवंशी, दत्तात्रय ठोकळ, वैभव बारवकर, जवान दिगंबर ठुबे ऊतम काळे,  कांबळे, सचीन वामने सचीन बटोळे, सांगुळे, महिला जवान रत्नमाला कलापहाड, शुभांगी आठरे, वाहनचालक संपत बिटके, श्री.शेळके यांनी यशस्वी रित्या पार पाडली.


Edited by-सचिन कलमदाणे

Video
0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post