मंत्री, अधिकार्यांना इलेक्ट्रीक वाहने वापरणं बंधनकारक....

 मंत्री, अधिकार्यांना इलेक्ट्रीक वाहने वापरणं बंधनकारक, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे सूतोवाचनवी दिल्ली - रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी शुक्रवारी मंत्रालये आणि विभागांतील सर्व अधिकाऱ्यांसाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर अनिवार्य व्हायला हवा, असे म्हटले आहे. एवढेच नाही, तर  गरिबांना स्वयंपाकाच्या गॅसवर सब्सिडी देण्याऐवजी विजेवर चालणारी आणि स्वयंपाकासाठी उपयुक्त असलेली  उपकरणे विकत घेण्यासाठी मदत करायला हवी, अशी सूचनाही गडकरी यांनी केली आहे. ते ‘गो इलेक्ट्रिक’ अभियानाला सुरुवात करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

गडकरी म्हणाले, आपण घरगुती गॅसवर पहिल्यापासूनच सब्सिडी देत आहोत. पण, आपण अन्न शिजवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक उपकरणांवर सब्सिडी का देत नाहीत? विजेवर अन्न शिजविण्याची प्रणाली स्वच्छ आहे. तसेच यामुळे गॅसची अयातही कमी होईल.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post