दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द केल्या....?

 दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द केलेल्या नाहीत: वर्षा गायकवाडमुंबई : "दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द केल्याचं कोणतंही वक्तव्य मी केलेलं नाही. अशाप्रकारची माहिती पूर्णपणे चुकीची आहे. प्रत्येकवेळी प्रश्न उपस्थित करुन बातमी देणं बरोबर नाही," असं स्पष्टीकरण राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलं. गायकवाड यांनी ‌एबीपी माझाशी बोलताना हा खुुुला केला आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेणं आम्हाला भाग आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.


तामिळनाडू सरकराने राज्यात दहावीच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तशाच प्रकारचा निर्णय महाराष्ट्रात घेतला जाऊ शकतो, असे संकेत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्याचे वृत्त प्रसारित झालं होतं. परंतु एबीपी माझाशी बोलताना वर्षा गायकवाड यांनी ही बातमी चुकीची आणि दिशाभूल करणारी असल्याचं म्हटलं.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post