‘या’ कंपनीच्या इलेक्ट्रिक कारवर 1.5 लाखांची विशेष सूट, सरकारी कर्मचार्‍यांना अतिरिक्त लाभ

इलेक्ट्रिक कारवर 1.5 लाखांची विशेष सूट, सरकारी कर्मचार्‍यांना अतिरिक्त लाभ

 


नवी दिल्ली : पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. कार कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला ज्या कंपन्यांच्या इलेक्ट्रिक कार्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, ह्युंदाय इंडिया फेब्रुवारी महिन्यात काही निवडक वाहनांवर आकर्षक सूट देत आहे.  इच्छूक ग्राहक निवडक Hyundai कार्सवर 1.5 लाख रुपयांचा लाभ घेऊ शकतात. यामध्ये सँट्रो (Santro), ऑरा (Aura), ग्रँड i10 Nios (Grand i10 Nios), एलेंट्रा (Elantra) आणि कोना (Hyundai Kona Electric SUV) या कार्सचा समावेश आहे. ह्युंदायने कोना इलेक्ट्रिक एसयूव्हीवर तब्बल 1.5 लाख रुपयांची सूट दिली आहे. विशेष म्हणजे यात कोणत्याही एक्सचेंज बोनस अथवा कॉर्पोरेट डिस्काऊंटचा समावेश करण्यात आलेला नाही. सोबत कंपनी सरकारी कर्मचाऱ्यांना 8000 रुपयांची अतिरिक्त सूट देत आहे. कंपनीने सादर केलेली नवीन ऑफर केवळ 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत लागू असेल.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post