पोलिसांची मोठी कारवाई, 12 कोटी 50 लाख रुपयांचे ड्रग्स जप्त

 पोलिसांची मोठी कारवाई, 12 कोटी 50 लाख रुपयांचे ड्रग्स जप्तमुंबई : डोंगरीत मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, 12 कोटी 50 लाख रुपयांचे ड्रग्स जप्त, डोंगरीतल्या एका हायप्रोफाईल इमारतीत ड्रग्सचा मोठा साठा सापडला आहे. डोंगरी पोलिसांनी एकूण तिघांना अटक केली आहे. अजूनही छापेमारी सुरू आहे.

पोलिसांकडून इसाक इकबाल हसन सय्यद (38), अब्दुल वसीम अब्दुल इजाज शेख(31) आणि मुख्य आरोपी दीपक संजीवा बांगेरा याला अटक करण्यात आली आहे. दीपक बंगेरा याच्या डोंगरी परिसरातल्या सन फ्लॉवर अपार्टमेंटमध्ये हा ड्रग्ससाठा मिळून आला आहे.

पोलिसांनी या इमारतीतून 5 लाखांची रोख रक्कम, दोन वजन काटे आणि ड्रग्स पॅकिंग करण्यासाठी लागणारे साहित्य हस्तगत केलं आहे. एनसीबीच्या डोंगरीतल्या कारवाईनंतर मुंबई पोलिसांची डोंगरी परिसरात मोठी कारवाई केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post