गाढवांवर संक्रांत, गाढवाचं मांस खाल्ल्याने 'जोश' वाढत असल्याचा समज

 गाढवाचं मांस खाल्ल्याने 'जोश' वाढत असल्याचा समजहैद्राबाद : एक निरुपद्रवी व ओझे वाहण्यासाठीच उपयुक्त अशी प्रतिमा असलेला प्राणी म्हणून गाढवांची ओळख आहे.

परंतु सध्या हेच गाढव आंध्रप्रदेशात प्रचंड भाव खात आहे. गाढवाचं मांस खाल्ले तर मर्दानी ताकद वाढते या समजातून लोकं सर्रास गाढव मारत आहेत. त्यामुळे आंध्रातली गाढवांची संख्या कमालीची घटली आहे.  आंध्रातल्या प्रकाशम, कृष्णा, पश्चिम गोदावरी आणि गुंटूर जिल्ह्यांमध्ये, मोठ्या प्रमाणात गाढवांची हत्या करून त्यांचं मांस खाल्लं जात आहे. या भागांत दर गुरूवार, रविवारी गाढवाचं मांस विकलं जातं. त्यासाठी दिवसाला कमीत कमी शंभर गाढवांची हत्या केली जाते. गाढवाच्या जिवावर उठणारा हा गाढवपणा वेळीच रोखण्यासाठी आता आंध्र प्रदेश सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post