रामदेव बाबांचे औषध पुन्हा वादग्रस्त, कोरोना लसीकरणावर 35 हजार कोटी रुपयांचा खर्च कशासाठी?


तर मग कोरोना लसीकरणावर 35 हजार कोटी रुपयांचा खर्च कशासाठी?  नवी दिल्ली : योग गुरू बाबा रामदेव यांनी नुकतेच  केंद्रीय मंत्री हर्षवर्धन आणि नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोनील या औषधाचं लाँचिंग केलं. तसेच या औषधाला जागतिक आरोग्य संघटनेचं (WHO) प्रमाणपत्र मिळाल्याचं म्हटलं. त्यानंतर थेट WHO नेच आपण अशा कोणत्याही पारंपारिक/आयुर्वेदीक औषधाची तपासणी केलेली नाही आणि प्रमाणपत्र दिलेलं नाही असं स्पष्ट केलं. याशिवाय इंडियन मेडिकल असोसिएशनने देखील रामदेव बाबांच्या या दाव्यावर आक्षेप घेतला. तसेच पतंजलीचं औषध कोरोनापासून संरक्षण करत असेल तर मग कोरोना लसीकरणावर 35 हजार कोटी रुपयांचा खर्च कशासाठी असा प्रश्न विचारलाय.

आयएमएने म्हटलं, “भारताचे आरोग्यमंत्री म्हणून तुमच्या समोर अशाप्रकारे खोटं सांगणं किती योग्य आणि तर्कसंगत आहे. अशाप्रकारच्या अवैज्ञानिक औषधाचं लाँचिंग करणं कितपत बरोबर आहे. आरोग्यमंत्री स्वतः एक डॉक्टर आहेत तरीही ते अशाप्रकारच्या औषधाला प्रोत्साहन देत आहेत हे किती नैतिक आहे. हे औषध म्हणजे लोकांनी फसवणूक असून पतंजलीचा दावा थेट जागतिक आरोग्य संघटनेने खोडल्याने देशाचीही जागतिक पातळीवर नाचक्की झालीय.”

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post