राज्यातील महाविद्यालये 'या' तारखेपासून खुली होणार

 १५ फेब्रुवारी पासून महाविद्यालये सुरू होणारमुंबई : राज्यातील महाविद्यालय सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत होती याबाबत काही बैठका देखील झाल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे येत्या १५ फेब्रुवारी पासून महाविद्यालय सुरू होणार आहे. सध्या पन्नास टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये महाविद्यालय सुरू होणार, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.विद्यार्थी 75 टक्के उपस्थिती अनिवार्य असली तरी यावर्षी तसं राहणार नाही याबाबत जी आर काढण्यात आला आहे, असे उदय सामंत म्हणाले. जे महाविद्यालयात येऊ शकत नाही त्यांना ऑनलाईन क्लासेसचा पर्याय उपलब्ध राहील, असेही उदय सामंत यांनी सांगितले. युजीसी गाईडलाईन्सनुसार राज्य सरकारने महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी दिली आहे, असे उदय सामंत म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post