मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरुद्ध देवेंद्र फडणवीस, भर बैठकीतून फडणवीसांचा वाॅक आऊट

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरुद्ध देवेंद्र फडणवीस, भर बैठकीतून फडणवीसांचा वाॅक आऊटमुंबई: अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी कमी करण्यास तीव्र विरोध करत आज विरोधी पक्षनेत्यांनी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीतून वॉकआऊट केले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे पळपुटे सरकार असल्याचे नमूद करत जोरदार टीकास्त्र सोडले. 

करोनाचा धोका वाढत असल्याचे कारण सांगून अधिवेशनाचे दिवस कमी करण्यात आले आहेत. ही फार गंभीर बाब आहे. यांचे मंत्री १० हजाराची गर्दी जमवतात तेव्हा करोना नसतो आणि अधिवेशनाला मात्र करोनाची भीती दाखवली जाते. तुमचे करोनाबाबतचे सल्ले फक्त आमच्यासाठीच आहेत का?, असा खरमरीत सवालच फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता विचारला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post