आ.संग्राम जगताप यांचे मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबासमवेत स्नेह भोजन
मुंबई: अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडतील आमदारांशी वैयक्तिक संवाद साधला आहे. यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी स्नेह भोजनाचे आयोजन केलं असून पहिल्या दिवशी नगरसह अन्य जिल्ह्यांतील आमदार उपस्थित होते. नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनीही या स्नेह भोजनास उपस्थित राहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, सामना च्या संपादक रश्मी ठाकरे यावेळी उपस्थित होते.
Post a Comment