कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेत दिव्यांग प्रमाणपत्र नोंदणी स्थगित

 कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेत दिव्यांग प्रमाणपत्र नोंदणी स्थगित

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पोखरणा यांची माहितीअहमदनगर :  जिल्हा रुग्णालय अहमदनगर येथे दिनांक 27 जानेवारी 2021 पासुन 20 फेब्रुवारी 2021 पर्यंत दिव्यांग प्रमाणपत्रासाठीची तपासणी व दिव्यांग प्रमाणपत्र वाटप चालू होते. प्रमाणपत्रासाठी होणारी गर्दी व कोरोनाचा प्रादुर्भाव पाहाता दिनांक 22 फेब्रुवारी 2021 पासून दिव्यांग प्रमाणपत्र पुढील निर्देश येईपर्यंत बंद ठेवण्यात येत असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी कळविले आहे.

 

त्याचप्रमाणे जिल्हा रुग्णालय अहमदनगर येथे ज्या व्यक्तींनी दिव्यांग प्रमाणपत्रासाठी कागदपत्र जमा केलेली आहेत, त्यांचे प्रमाणपत्र तयार करण्याचे काम चालू आहे. तयार होणारे सर्व प्रमाणपत्रांचे वाटप प्रत्येक तालुक्याच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये होणार आहे. त्यामुळे तयार होणा-या प्रमाणपत्रासाठीही कोणीही जिल्हा रुग्णालयामध्ये येवू नये. जिल्हा रुग्णालयामध्ये फक्त नगर तालुक्यातील प्रमाणपत्र वाटप होणार आहे. सदरचे दिव्यांग प्रमाणपत्रे शुक्रवार दिनांक 26 फेब्रुवारी 2021 पासून वाटप होणार आहेत. त्यामुळे सर्व दिव्यांग बांधवांनी ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क साधावा. तसेच जेव्हा कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी होईल तेव्हा पुन्हा दर बुधवारी दिव्यांग प्रमाणपत्र देण्याचे कामकाज पुर्ववत चालू होईल, याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे. ***

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post