रात्री उशिरा गावाकडे जाण्यासाठी त्यांनी बसस्थानकातील एस.टी.च पळवली

 

रात्री उशिरा गावाकडे जाण्यासाठी त्यांनी बसस्थानकातील एस.टी.च पळवलीलातूर : लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातल्या औराद शहाजनी इथे एसटी बस पळवल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आलाय. गावाला जाण्यासाठी रात्री उशिरा बस नसल्यामुळे काही अज्ञात तरुणांनी दारूच्या नशेत औरादच्या एसटी बसस्थानकात उभी असलेली बस पळविली. यावेळी दोन ठिकाणी बस आपटून २५ हजारांचं नुकसानही झालं. 

निलंगा आगाराची निलंगा-औराद शहाजनी ही एसटी बस स्थानकात लावून बस चालक विश्रांतीगृहात झोपण्यासाठी गेले. त्यानंतर मध्यरात्री जाग आल्याने बाहेर येताच बस स्थानकात नसल्याचं दिसंलं. शोधाशोध करून पोलिसांनी याची माहिती दिली. पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना ही बस निलंगा तालुक्यातील शेळगी इथे सापडली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post