बाळ बोठे याचा 'तो' अर्ज न्यायालयाने फेटाळला

 

बाळ बोठे यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळलानगर : नगरमधील रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळ बोठे याने पारनेर न्यायालयाने काढलेल्या स्टॅडिंग वॉरंटविरूद्ध पुनर्निरीक्षण अर्ज जिल्हा न्यायालयात दाखल केला होता. तो अर्ज जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी फेटाळून लावला आहे. यामुळे बोठे याच्या अडचणीत वाढ झाली आहे.

30 नोव्हेंबरला रेखा जरे यांची हत्या झाल्यानंतर बाळ बोठे पसार झाला आहे. तो मुख्य आरोपी असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालय व औरंगाबाद खंडपीठाने फेटाळून लावला आहे. पोलिसांना तो सापडत नसल्याने पोलिसांनी त्याच्याविरूद्ध पारनेर न्यायालयाकडून स्टॅडिंग वॉरंट मंजूर करून घेतले आहे. या वॉरंटला बोठे याच्याकडून जिल्हा न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यावर सुनावणी घेत न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी बोठे याचा अर्ज फेटाळून लावत पारनेर न्यायालयाने दिलेला निकाल कायम केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post