...तर महाराष्ट्रात शिवसेनेचे अस्तित्वच राहीलं नसते: अमित शहा

 ...तर महाराष्ट्रात शिवसेनेचे अस्तित्वच राहीलं नसते: अमित शहासिंधुदुर्ग: महाराष्ट्रात तीन चाकी ऑटोरिक्षाचं सरकार तयार झालं आहे. तीन चाकी सरकारची चाकं तीन दिशेला असल्याचं म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील सरकारवर हल्लाबोल केला आहे. ते सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे यांच्या वैद्यकिय महाविद्यालयाच्या उदघाटन सोहळ्याचा प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणतात आम्ही वचन तोडलं. आम्ही वचन पाळणारे लोक आहोत. आम्ही असं ढळढळीत खोटं बोलत नाही. बिहारमध्ये आम्ही नितीश कुमार यांच्या कमी जागा येऊनही ठरल्याप्रमाणे त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं. नितीश कुमार यांनी भाजपचा मुख्यमंत्री करा असं म्हटलं होतं तरी आम्ही शब्द पाळला. आज नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री आहेत, याकडे अमित शाह यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना भाजप शिवसेनेच्या वाटेवर चालली असती तर शिवसेना महाराष्ट्रात उरलीच नसती

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post