भाजप नेत्याच्या कंपनीकडून चक्क राष्ट्रवादीला पक्ष निधी
मुंबई: राज्यात सत्तेतील महत्त्वाची खाती राष्ट्रवादीला मिळाली आहेच पण राष्ट्रवादीच्या गंगाजळीत पाच पटीने वाढ झाली आहे. एवढेच नव्हे तर राष्ट्रवादीला भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्याकडूनही कोट्यवधीची आर्थिक मदत मिळाली आहे.
आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये राष्ट्रवादीला 59.94 कोटीचा निधी मिळाला होता. गेल्या वर्षी हा निधी 12.05 कोटी रुपये होता. राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे पक्षाच्या योगदानाचा अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आणि आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या लोढा डेव्हल्पर्सने राष्ट्रवादीला 5 कोटींचा निधी दिल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. ‘द प्रिंट’ने या बाबतचे वृत्त दिलं आहे. प्रत्येक वर्षी राजकीय पक्षांना त्यांच्या 20,000 रुपयांच्या योगदानाची माहिती निवडणूक आयोगाला द्यावी लागते. त्यातून ही माहिती उजेडात आली आहे.
Post a Comment