मंत्री छगन भुजबळ यांनाही करोनाची बाधा
मुंबई: राज्यातील ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांनाही करोनाची बाधा झाली आहे. स्वतः भुजबळ यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. भुजबळ यांनी म्हटले आहे की,
माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन तीन दिवसात माझ्या संपर्कात अलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी.माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी.मास्क,सॅनिटायझर चा नियमित वापर करा.
Post a Comment