...आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी चालू बैठकीतून अधिकार्याला हाकलले

मुख्याधिकारी डॉ.उत्कर्ष गुट्टेंना डिपीडीसीच्या बैठकीतून हाकलले, निलंबनाची कारवाई प्रस्तावित; माहिती न देणे अंगलट

 


बीड : जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे अध्यक्ष असलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकी प्रसंगी मुख्याधिकार्‍यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहे. माहिती सादर न करणाऱ्या बीड नगर पालिकेच्या मुख्याधिकारी डॉ.उत्कर्ष गुट्टे यांना पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह सदस्यांनी चांगलाच दणका दिली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी सर्व विभागांकडून विविध विषयांची माहिती मागविण्यात येते. याप्रसंगी मुख्याधिकारी गुट्टे यांनी नगर पालिकेतील विविध विकास कामे, अनुपालन अहवाल व योजनांची माहिती दिली नाही. त्यामुळे सर्व सदस्यांनी गुट्टे यांना सभागृहाबाहेर हाकलले. त्यांच्याविरूद्ध निलंबनाच्या कारवाईचा ठराव घेवून कार्यवाही प्रस्तावित करण्याच्या सूचना पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्या आहेत. या कार्यवाहीने प्रशासनातील कामचुकार अधिकारी कर्मचाऱ्यावर वचक निर्माण झाला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post