पंतप्रधान मोदींचं ठरलं...सर्व ‌सार्वजनिक बॅंकांचे खाजगीकरण

 

व्यवसाय करणे हे सरकारचे काम नाही, सर्व ‌सार्वजनिक बॅंकांचे खाजगीकरण
नवी दिल्ली:  व्यवसाय करणे हे सरकारचे काम नसून देशातील उद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्यास सरकारने प्राधान्य द्यायचे असते, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  देशातील सर्व राष्ट्रीयीकृत बँकांचे खासगीकरण करण्याचे संकेत  बुधवारी दिले. 

केंद्रीय अर्थ खात्यांतर्गत येणाऱ्या गुंतवणूक व सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागामार्फत एका दृकश्राव्य माध्यमातून झालेल्या चर्चासत्राला पंतप्रधान संबोधित करत होते. सरकारच्या १.७५ लाख कोटी रुपयांच्या निगुंतवणुकी प्रक्रिया पार पाडण्याचे काम या विभागाकडे आहे.

केंद्र सरकार देशातील सर्व सार्वजनिक बँकांचे खासगीकरण करण्याच्या तयारीत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. सर्व क्षेत्रात सरकारने असण्याची आवश्यकता नाही, असेही ते म्हणाले. सार्वजनिक उपक्रमांच्या अत्याधुनिकरणासाठी सरकारची धोरणे यापुढेही असतील, असेही नमूद केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post