बंजारा समाज आक्रमक, चंद्रकांत पाटील, फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारले

 बंजारा समाज आक्रमक, चंद्रकांत पाटील, फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारलेबीड : बीडमध्ये बंजारा समाज आक्रमक, भाजपच्या देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन. बीडमध्ये भाजप विरोधात बंजारा समाज आक्रमक झालाय. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला, जोडे मारून बंजारा समाजाने भाजपचा निषेध व्यक्त केलाय. यावेळी संजय राठोड यांना जाणीवपूर्वक अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अद्याप एकही आरोप सिद्ध झाला नसताना, त्यांना विरोधीपक्षातील नेते आरोपी म्हणत आहेत. यामुळं संबंध बंजारा समाजाच्या भावना दुखावत आहेत. त्यामुळं जोपर्यंत त्यांची चौकशी सुरू आहे तोपर्यंत आरोप सिद्ध होत नाहीत, तोपर्यंत त्यांना आरोपी म्हणू नये. अशी मागणी बंजारा समाजातील तरुणांनी केलीय.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post