मोठी बातमी... 'या' ठिकाणी आठवडाभर टोटल लॉकडाऊन

 मोठी बातमी... अमरावतीत आठवडाभर टोटल लॉकडाऊन



अमरावती :  अमरावतीत येत्या आठवड्यात लॉकडाऊन असणार आहे. हा लॉकडाऊन सोमवारी ( 22 फेब्रुवारी) संध्याकाळी आठ वाजेपासून अमरावती शहर, अचलपूर शहर आठवड्याभरासाठी घोषित करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन सात दिवसांसाठी असणार आहे. विशेष म्हणजे राज्यात अनलॉकनंतर हा पहिलाच लॉकडाऊन असेल.

सगळ्यांची काळजी घेण्याची गरज असल्याने हा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. कोरोना मृत्यू दर हा सध्या 1.6 टक्के इतका आहे. आम्हाला नाईलाजाने फक्त जीवानाश्यक वस्तू सुरु ठेवावी लागणार आहेत. अमरावती शहरात पूर्ण कंटेन्मेंट झोन घोषित करुन लॉकडाऊन घोषित करण्यात येत आहे. शहरातील बाजार हे गाईडलाईन्सनुसारच सुरु राहतील”, असं यशोमती ठाकूर यांनी सांगितलं.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post