कशाला शिळ्या कढीला ऊत आणता, अमित शहांच्या वक्तव्यावर अजितदादांची प्रतिक्रिया
नागपूर : भाजप शिवसेनेच्या वाटेवर चालली असती तर महाराष्ट्रात शिवसेनेचे अस्तित्वच राहीलं नसते, असा घणाघात केंद्रीय गृहमंत्री अमित शाहंनी केला आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता जाऊ द्या कशाला शिळ्या कढीला उत आणता. स्वतः उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. बंद दाराआड काय घडले? हे सांगायला मी काही ज्योतिषी नाही, अशी प्रतिक्रिया पवारांनी दिली. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारचा आतापर्यंतचा बराच काळ कोरोना महामारीत गेला आहे. त्यामुळे विकास दर घटला असल्याची कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
Post a Comment