राज्यपालांनी अंत पाहू नये, अजितदादा पवार यांचं मोठं वक्तव्य

 

राज्यपालांनी अंत पाहू नये, आमदार नियुक्ती रखडल्याने अजितदादांचा संतापपुणे: विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्त्या रखडल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार संतापले आहेत.प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी हा संताप व्यक्त केला. राज्यपाल नियुक्त सदस्यांची अजूनही नियुक्ती करण्यात आलेली नाही, याकडे अजित पवार यांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावर ते बोलत होते. यावेळी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते. राज्यपालांना 12 नावं दिली आहेत. सर्व नियम आणि अटी पाळून ही नावं दिली आहेत. कॅबिनेटमध्ये ठराव करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या सहीचं पत्रंही देण्यात आलं. आम्हाला पूर्ण बहुमत आहे. सभागृहातही 171 आमदारांचं बहुमत सिद्ध करण्यात आलं आहे. त्यामुळे या नावावर राज्यपालांनी निर्णय घ्यावा, राज्यपालांनी अंत पाहू नये, असं अजित पवार म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post