विद्युत जोडणीसाठी ४५०० रुपयांची लाच, वीज कर्मचारी'एसीबी'च्या जाळ्यात

 विद्युत जोडणीसाठी ४५०० रुपयांची लाच, वीज कर्मचारी'एसीबी'च्या जाळ्यातनगर : विद्युत जोडणी लवकर देऊन मीटर बसवुन देणे करिता तक्रारदाराकडून साडेचार हजार रुपये लाच स्वीकारताना वीज कंपनीच्या असिस्टंट लाईनमनला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. यात आरोपी नवनाथ नामदेव निर्मल, (वय  ४३, धंदा -सहायक तंत्रज्ञ, (असिस्टंट लाईनमन) वर्ग - ४ म.रा.वि.वि.कंपनी, लोणी- २ ता.राहता.रा. अस्तगाव रोड, पिम्प्री निर्मल, ता. राहता, जि. अहमदनगर)   याला ताब्यात घेतले आह 

तक्रारदार यांनी त्यांचे आडगाव खुर्द, ता. राहता येथील राहते घरी विद्युत जोडणी घेणे करिता वडिलांचे नावे कोटेशन भरले होते. विद्युत जोडणी लवकर देऊन मीटर बसवुन देणे करिता यातील आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांचे कडे ४५००/- ची मागणी केली. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून केलेल्या लाच मागणी पडताळणी मध्ये आरोपीने पंचासमक्ष  ४५००/- ₹ लाचेची  मागणी केली. सदरची रक्कम आज दि  ०८/०२/२०२१ रोजी आयोजित लाचेचा सापळा कारवाई दरम्यान तक्रारदार यांचे कडुन पंचा समक्ष, हॉटेल साई छत्र, लोणी ता. राहता येथे स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडले आहे.


▶️ *सापळा अधिकारी*:- श्याम पवरे, पोलीस निरीक्षक ला.प्र. वि. अहमदनगर

 ▶️  *पर्यवेक्षण अधिकारी** हरीष खेडकर, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, अहमदनगर

▶सापळा पथक:- पो हवा तन्वीर शेख,  पो ना प्रशांत जाधव. पो ना.चौधरी, विजय गंगुल, पो शि रविंद्र निमसे, वैभव पांढरे, मपोशि राधा खेमनर,  संध्या म्हस्के.  चालक पो ह. हरुन शेख. 

▶ **मार्गदर्शक* -*मा.श्री सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक

▶मा.श्री निलेश सोनवणे सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि नाशिक.

▶ *आरोपीचे सक्षम अधिकारी:* कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.कं श्रीरामपूर विभाग, जि- अहमदनगर .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post