लाच प्रकरणात महिला तलाठी एसीबीच्या जाळ्यात
नगर : तक्रारदार यांनी त्यांचे खडकेवाके हद्दीतील वडिलांचे व चुलत्यांचे नावे असलेल्या शेतजमीनीचे वाटणी पत्र व हक्क सोड पत्रा आधारे नोंदी घेऊन फेरफार देणे करिता ६ हजारांची लाच स्वीकारताना महिला तलाठी एसीबीच्या जाळ्यात अडकली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नगरमधील पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी आरोपी स्वाती गौतम मेश्राम, (वय ३७ वर्ष, धंदा - नौकरी, तलाठी, सजा केलवड,वर्ग ३, ता. राहता, जि. अहमदनगर. रा. स्वामी रेसीडेन्सी, बस स्टॅण्ड पाठीमागे, राहाता, ता. राहाता, जि. अहमदनगर) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार यांनी त्यांचे खडकेवाके हद्दीतील वडिलांचे व चुलत्यांचे नावे असलेल्या शेतजमीनीचे वाटणी पत्र व हक्क सोड पत्रा आधारे नोंदी घेऊन फेरफार देणे करिता यातील आरोपी लोकसेविका यांनी तक्रारदार यांचे कडे ₹ ७०००/- ची मागणी केली. तक्रारदार यांना आरोपी लोकसेविका यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने, त्यांनीं दिलेल्या तक्रारीवरून केलेल्या लाच मागणी पडताळणी मध्ये आरोपीने पंचासमक्ष ₹ ७०००/- ची मागणी करुन तडजोडीअंती ₹ ६०००/- लाचेची मागणी केली. सदरची रक्कम आज दि ०९/०२/२०२१ रोजी आयोजित लाचेचा सापळा कारवाई दरम्यान तक्रारदार यांचे कडुन पंचा समक्ष, केलवड तलाठी कार्यालय, ता. राहता येथे स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडले आहे.
▶️ *सापळा अधिकारी*:- श्याम पवरे, पोलीस निरीक्षक ला.प्र. वि. अहमदनगर
▶️ *पर्यवेक्षण अधिकारी** हरीष खेडकर, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, अहमदनगर
▶सापळा पथक:- पो हवा तन्वीर शेख, पो ना प्रशांत जाधव. पो ना.चौधरी, विजय गंगुल, पो शि रविंद्र निमसे, वैभव पांढरे, चालक पो ह. हरुन शेख.
▶ **मार्गदर्शक* -*मा.श्री सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
▶मा.श्री निलेश सोनवणे सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि नाशिक.
▶ *आरोपीचे सक्षम अधिकारी:* मा. जिल्हाधिकारी , अहमदनगर .
Edited by- sachin kalamdane
Post a Comment