5 हजारांच्या लाच प्रकरणी पोलिस हवालदार 'एसीबी'च्या जाळ्यात

 5 हजारांच्या लाच प्रकरणी पोलिस हवालदार 'एसीबी'च्या जाळ्यातनगर : तक्रारदार यांचे विरुद्ध पारनेर पोलिस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात प्रतिबंधक कारवाई करुन तहसील कार्यालयात पाठविणे व तक्रारदार यांची क्रॉस कम्प्लेंट घेणे करिता ५ हजारांची लाच मागितल्या प्रकरणी पोलिस हवालदार'एसीबी'च्या जाळ्यात अडकले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नगरमधील पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी आरोपी शंकर गुलाब रोकडे,  (वय 49 वर्षे, पोलीस हेडकॉन्स्टेबल ब.न. 1997,  वर्ग 3 , नेमणूक- पारनेर पोलिस स्टेशन, रा.श्रीराम हौसिंग सोसायटी,  निशा लॉन्स चे पाठीमागे  केडगाव, ता नगर, जि. अहमदनगर) यास अटक करण्यात आली असून आरोपी विरुद्ध पारनेर पो स्टे येथे गुन्हा दाखल केला आहे.

▶️ *सापळा अधिकारी*  हरिष खेडकर, पोलीस उप अधीक्षक

ला.प्र.वि.अहमदनगर

 ▶️ *सहा सापळाअधिकारी** श्याम पवरे, पोलीस निरीक्षक

ला.प्र.वि.अहमदनगर

▶ **मार्गदर्शक* -

*मा.श्री सुनील कडासने सो.* पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक 

*मा.श्री निलेश सोनवणे सो.* 

अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक 

▶ *आरोपीचे सक्षम अधिकारी* -  मा.पोलीस अधीक्षक, अहमदनगर

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post