कॉंग्रेसच्या माजी पंतप्रधानांचे बंधू 'आप'च्या तंबूत

माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांचे बंधू 'आप'मध्ये दाखलअमृतसर:  माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे बंधू एसएस कोहली यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन आम आदमी पार्टीत प्रवेश केला आहे. त्यांच्या सोबत अमृतसरचे माजी महापौर ओम प्रकाश गब्बर यांनीही आपमध्ये प्रवेश केला आहे. 

ओम प्रकाश गब्बर पहिल्यांदा अकाली दलाच्या तिकिटावर नगरसेवक झाले होते. 2017मध्ये ते काँग्रेसमध्ये गेले होते. त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूकही लढली होती. गब्बर हे भगवान वाल्मिकी धूना साहिब मॅनेजमेंट ट्रस्टचे अध्यक्षही आहेत. तर मनमोहन सिंग यांचे बंधू एसएस कोहली हे लष्करातील माजी कमांडर आहे. आम आदमी पार्टीच्या धोरणांवर प्रभावित होऊन त्यांनी आपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post