विभागीय स्पर्धेसाठी रविवार दि.14 रोजी व्हॉलीबॉल निवड चाचणी स्पर्धा

 विभागीय स्पर्धेसाठी रविवार दि.14 रोजी व्हॉलीबॉल निवड चाचणी स्पर्धाअहमदनगर: पुणे विभागीय व्हाॅलीबाॅल स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्हा व्हाॅलीबाॅल संघाची निवड चाचणी रविवार दि.14 फेब्रवारी 2021 रोजी सकाळी 10 वा. जिल्हा क्रीडा संकुल, वाडियापार्क, अहमदनगर येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा व्हाॅलीबाॅल संघटनेचे सचिव प्रा.एल.बी.म्हस्के यांनी दिली आहे.
16 वर्षाआतील सबज्युनिअर, 18 वर्षाआतील ज्युनिअर व 21 वर्षाआतील युथ गटातील मुले व मुलींच्या निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या निवड चाचणीसाठी खेळाडूंच्या जन्मतारखा या प्रमाणे असतील 16 वर्षाआतील मुले व मुली 1/1/2005 किंवा त्यानंतर जन्मलेला, 18 वर्षाआतील ज्युनिअर 1/1/2003 किंवा त्यानंतर जन्मलेला व 21 वर्षाआतील युथसाठी 1/1/2000 किंवा त्यानंतर जन्मलेला असावा.
अषा पात्र खेळाडूंनी निवड चाचणी स्पर्धेत येतांना शाळेचे इंग्रजी मधील बोनाफाईड प्रमाणपत्र घेवून यावे. तसेच 10 उत्तीर्ण विद्याथ्र्यांनी 10 वी पासचे बोर्ड प्रमाणपत्र घेवून यावे. तसेच संघटनेचा वहित नमुन्यातील फाॅर्म प्राचार्य, मुख्याध्यापक यांच्या सहीने 3 प्रतीमध्ये भरून आणवा.
निवड चाचणीसाठी जास्तीत जास्त खेळाडूंनी व संघानी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा व्हाॅलीबाॅल संघटनेचे अध्यक्ष मा.खा.प्रसाद तनपुरे, सचिव प्रा.एल.बी.म्हस्के, उपाध्यक्ष शैलेश गवळी, रमेश मोरगावकर, खजिनदार प्रा.संजय अनभुले, सहसचिव प्रा.बबनराव झावरे, दिलीपराव घोडके, अजय गाडेकर, सुधाकर बोरकर, चंद्रकांत काळोखे, संजय वालेकर आदींनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post