महाराष्ट्र उद्रेकाच्या छायेत, आज 'इतक्या' हजारांहून अधिक बाधित

 महाराष्ट्र उद्रेकाच्या छायेत, आज सहा हजारांहून अधिक बाधितमुंबई : राज्यात कोरोना रुग्णांचा पुन्हा एकदा उद्रेक होऊ लागला आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 6 हजार 112 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 44 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 20 लाख 87 हजार 632 इतका झाला आहे.राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, आज (19 फेब्रुवारी) राज्यात 6 हजार 112 नव्या रुग्णांचे नोंद झाली आहे. तसेच गेल्या 24 तासात 44 हजार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.48 टक्के इतका आहे. तर दुसरीकडे आज 2 हजार 159 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्या एकूण रुग्णांची संख्या 19 लाख 89 हजार 963 इतकी झाली आहे. सध्या राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.32 टक्के इतके आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post