अमरावती येथून अपहरण झालेल्या 4 वर्षांच्या मुलाची सुटका, नगरमध्ये आरोपींना केलं जेरबंद

अमरावती येथून अपहरण झालेल्या 4 वर्षांच्या मुलाची सुटका, नगरमध्ये आरोपींना केलं जेरबंदनगर - अमरावती शहरातून अपहरण केलेल्या ४ वर्षाच्या मुलाची अहमदनगर येथून सुटका करुन अपहरणकर्ते जेरबंद करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे. हिना शाकीर शेख उर्फ हिना अनिकेत देशपांडे (वय-२५ वर्षे, रा. फलटण चौकीजवळ, कोठला, अहमदनगर), अल्मस ताहीर शेख (वय- १८ वर्षे, रा. कोठला, अहमदनगर), मुसाहीब नासीर शेख (वय- २१ वर्षे, रा.मुकुंदनगर, अहमदनगर), आसिफ हिनायत शेख (वय-२४ वर्षे, रा. कोठला, अहमदनगर), आणि फैरोज रशिद शेख (वय- २५ वर्षे,रा. कोठला, अहमदनगर) अशी आरोपींची नावे आहेत.


बुधवार दि. १७ रोजी रात्री मोनीका लुणिया या त्यांचा नातू नयन (वय- ४ वर्षे) यास फिरायला घेवून बाहेर गेल्या असता एका मोटार सायकलवरुन आलेल्या एक अनोळखी महिला व अनोळखी पुरुष यांनी मुलगा नयन यांस पळवून नेले होते. त्याबाबत महेन्द्र श्रीरामजी वाटणकर, राजापेठ पोलिस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरुन भादवि कलम ३६३, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर अपहरणकर्त्याबाबत मिळालेल्या माहितीवरुन पोलीस आयुक्त, अमरावती शहर यांनी पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांना घडलेल्या घटनेबाबत माहिती देवून अमरावती शहर पोलीसांचे पथक तपासकामी अहमदनगर येथे पाठविले. पथक अहमदनगर येथे दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी गुन्ह्यातील अपहरण झालेल्या मुलाचा व अपहरणकर्त्यांचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथक नेमण्याबाबत सुचना दिल्या. त्याप्रमाणे पोनि. अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी वअंमलदार यांची तीन वेगवेगळी पथके नेमून अपहरण झालेल्या मुलाचा व अपहरणकर्त्यांचा शोध घेण्यासाठी सुचना दिल्या. हा गुन्हा हिना शेख व मुसाहिब शेख यांनी मिळून केला असल्याची माहिती मिळाली.

अपहरणकर्ते हे मुलास घेवून अहमदनगर येथून कल्याण रोडने कल्याणचे दिशेने गेले असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर मिळालेल्या माहितीवरुन अपहरणकर्ते हे एका मोटार सायकल वरुन अपहरण झालेल्या मुलास घेवून कल्याणचे दिशेने जात असताना त्यांचा पाठलाग करुन त्यांना स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने अपहरण केलेल्या मुलासह ताब्यात घेतले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post