जिल्ह्यातील करोना रुग्णसंख्येत आज मोठी वाढ
नगर: गेला महिनाभर सरासरी १०० रूग्णसंख्या असलेल्या नगर जिल्ह्यात मागील २४ तासात तब्बल १७१ नवीन बाधितांची भर पडली आहे. गेल्या काही दिवसांतील ही लक्षणीय रूग्णसंख्या आहे. आज एकूण १३० रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. नगर मनपा हद्दीत नवीन ३१ बाधितांची भर पडली. राहाता तालुक्यात सर्वाधिक २४ रूग्ण वाढलेत. जिल्ह्यात एकूण ८६० रूग्णावर सध्या उपचार चालू आहेत.
Post a Comment