ब्लॅक संडे....बस व ट्रकचा भीषण अपघात, 13 जणांचा मृत्यु

 ब्लॅक संडे....बस व ट्रकचा भीषण अपघात, 13 जणांचा मृत्यु



नवी दिल्ली : आंध्र प्रदेशमध्ये भीषण अपघात झाला आहे. बस आणि ट्रकची जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाला. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. अपघातातील जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशमध्ये रविवारी (14 फेब्रुवारी) सकाळी हा भीषण अपघात झाला आहे. कर्नूल जिल्ह्यातील वेलदुर्ती मंडळाजवळील मदारपूर गावात एका बस आणि ट्रकची जोरदार धडक झाली. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाले आहेत. पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून वेगाने मदतकार्य सुरू आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post