जिल्हा परिषद कर्मचार्यांची शनिवारी आरोग्य तपासणी
नगर : नगर जिल्हा परिषदेत शनिवार दि.9 जानेवारी रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 याकालावधीत कर्मचार्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात थायरॉईड, शुगर इत्यादी रक्त तपासणी करण्यात येणार आहे. यात लिपीड प्रोफाईल तपासणीचीही व्यवस्था असून ही चाचणी करणार्या कर्मचार्यांनी रात्रीच्या जेवणानंतर बारा तास म्हणजे सकाळी 8 वाजता उपस्थित राहून तपासणी करून घ्यावी. सदर तपासणी जिल्हा परिषद मुख्यालयातील चौथ्या मजल्यावरील सभागृहात होणार आहे, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी दिली.
Post a Comment