शुक्राचार्यांना बाजूला करा; शरद पवारांनी साधला ‘या’ नेत्यावर निशाणा

 

शुक्राचार्यांना बाजूला करा; शरद पवारांनी साधला ‘या’ नेत्यावर निशाणाराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज अकोल्याच्या कार्यक्रमात बोलताना  एकेकाळचे राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य मधुकर पिचड यांच्यावर निशाणा साधला.

अकोले (अहमदनगर): राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज अकोल्याच्या कार्यक्रमात बोलताना  एकेकाळचे राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य मधुकर पिचड यांच्यावर निशाणा साधला. जनतेला पक्ष बदलाची भूमिका आवडत नाही असं म्हणत मधुकर पिचड यांचा पवारांनी शुक्राचार्य असा उल्लेख केला. तर या शुक्राचार्यांना अगस्ती सहकारी साखर कारखान्यातून बाजूल करा कारखान्यासाठी मी तुम्हाला सर्वोतपरी मदत करतो, असं पवार म्हणाले. 

शरद पवार आज नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. पवारांचे जुने सहकारी माजी आमदार कै. यशवंत भांगरे यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमासाठी पवारांनी उपस्थिती लावली. या सोहळ्यात केलेल्या भाषणात त्यांनी पिचडांचा जोरदार समाचार घेतला.

“जनतेला पक्ष बदलाची भूमिका आवडत नाही. विधानसभेला मी अकोल्यात सभा घेतली त्यावेळीच जनतेच्या मनातल मला कळालं होतं. जनतेला परिवर्तन हवं होतं. किरण लहामटे यांनी वैभव पिचडांना पराभूत करुन ते परिवर्तन घडवून आणलं”, असं पवार म्हणाले.

“अकोल्यातला अगस्ती सहकारी साखर कारखाना कर्जाच्या बोजाखाली असल्याचं मला कळालं. कारखान्यावर 200 कोटीच‌ं कर्ज झालं आहे. जे या‌ कर्जाला जबाबदार आहे त्या शुक्राचार्यांना बाजूला करा, कारखाना चालवण्यासाठी‌ सर्व ती मदत मी करतो”, असं म्हणत पवारांनी पिचडांवर टीका केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post